एका शब्दाचेअनेक अर्थ
एका शब्दाचेअनेक अर्थ एका शब्दाचेअनेक अर्थ शब्द अनेक अर्थ अभंग न भंगलेला , का व्यरचनेचा एक प्रकार अनंत परमेश्वर , अमर्याद अंग शरीर , बाजू , भाग अंक संख्या , मांडी अंबर आकाश , वस्त्र अंतर मन , लांबी , भेद , फरक आस इच्छा , गाडीच्या दोन चाकांना जोडणारा कणा आनंद सुखाची कल्पना , मुलाचे नाव ओढा आकर्षण , मनाचा कल , पाण्याचा लहान ओघ उत्तर प्रश्नाचे उत्तर (खुलासा) , एका दिशेचे नाव ऋण वजाबाकीचे चिन्ह , कर्ज , उपकार कर हात , सरकारी सारा , किरण कलम रोपांचे कलम , लेखणी कळ वेदना , भांडणाचे कारण , गुप्त किल्ली , बटन कर्ण महाभारतातील योद्धा , कान , त्रि. काटकोनासमोरील बाजू काळ वेळ , मृत्यू , यम कांबळे घोंगडी , एक आडनाव किरण उन्हाची तिरीप , व्यक्तीचे नाव कीर्ती प्रसिद्धी , मुलीचे नाव कुबेर इंद्रदेवाचा खजाना , खूप श्रीमंत...
